पालिकेच्या रुग्णालयातील एमआरआय, सीटीस्कॅन महागले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2014

पालिकेच्या रुग्णालयातील एमआरआय, सीटीस्कॅन महागले

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील ६ रुग्णालयांमधील 'एमआरआय' स्कॅन आणि 'सीटी स्कॅन'चे दर वाढले असून, एमआरआयसाठी २५00 रुपये आणि सीटीस्कॅनसाठी १२00 रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, या सेवा खाजगी संस्थांकडे दिल्या असून, पालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीपुढे संमतीसाठी सादर केला आहे. 
पश्‍चिम उपनगरातील कांदिवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर आणि रुग्णालय, पूर्व उपनगरातील भाभा रुग्णालय, मुलुंडमधील एमटी अग्रवाल रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय येथे एमआरआय आणि सीटीस्कॅन सेवा खाजगी संस्थांना देण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, सिद्धार्थ रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर आणि रुग्णालयात ही सेवा कृष्णा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आणि कुर्ल्यातील भाभा रुग्णालय, एमटी अग्रवाल रुग्णालय, राजावाडी रुग्णालय या ठिकाणी एमआरआय आणि सीटीस्कॅन सेवा उबैर इंक मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सोपवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे, मात्र पालिकेच्या या निर्णयावर सुधार समितीचे शिक्कामोर्तब अद्याप झालेले नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS