मुंबई - सामाजिक न्याय विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन राबवली जाणार आहे. ही प्रक्रिया 25 जूनपासून सुरू झाली; मात्र विद्यार्थ्यांचे अर्ज 5 जुलैपासून "सबमिट‘ होऊ लागले. अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (ता. 15) संपणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली आहे. आर्थिक आणि सामाजिक मागास विद्यार्थ्यांसाठी राज्यात 271 शासकीय वसतिगृहे आणि 1500 अनुदानित वसतिगृहे आहेत. त्यापैकी मुंबई आणि उपनगरात मुलींसाठी दोन आणि मुलांसाठी पाच अशी एकूण सात वसतिगृहे आहेत. सर्व वसतिगृहांची प्रवेशप्रक्रिया यंदापासून ऑनलाईन करण्यात आली असली, तरी संकेतस्थळातील तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाहीत.
Post Top Ad
15 July 2014
Home
Unlabelled
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशांचा बोजवारा
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशांचा बोजवारा
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

