दीड लाख फुकट्या प्रवाशांना पकडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2014

दीड लाख फुकट्या प्रवाशांना पकडले

मुंबई : विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांमुळे रेल्वेचा महसूल बुडत असून अशा प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. पश्‍चिम रेल्वेने जुलै महिन्यात केलेल्या कारवाईत दीड लाख फुकट्या प्रवाशांना पकडले आहे.

या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून पश्‍चिम रेल्वेला ५ कोटी ७३ लाखांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षीच्या याच महिन्यापेक्षा हा महसूल ११.३३ टक्के अधिक असल्याचे पश्‍चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आरक्षित तिकीट अनधिकृतरीत्या दुसर्‍याच्या नावावर करण्याच्या केसेसही पकडण्यात आल्या असून अशा ६६ केसेस असल्याचे सांगण्यात आले. यात केलेल्या कारवाईतून ८१ हजार ३५0 रुपये दंड वसूल केला आहे. तसेच १,१0२ अनधिकृत फेरीवाले आणि भिकार्‍यांवरही कारवाई करण्यात आली असून यातील १0६ जणांना कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. 

दलाल आणि संशयित व्यक्तींविरोधात केलेल्या कारवाईसाठी १९0 तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. यात १५0 जणांना पकडण्यात आले आहे. यातील बारा जणांना जेलमध्ये पाठवण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधील महिलांच्या डब्यातून १२ वर्षांवरील शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मुभा नाही. तरीही अशी मुले वारंवार प्रवास करून डब्यात गोंधळ घालतात. जुलै महिन्यात अशा २५५ शालेय विद्यार्थ्यांना रेल्वे पोलिसांनी महिला डब्यातून बाहेर काढले.

Post Bottom Ad

JPN NEWS