ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात तापाचे १,८९२ रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2014

ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात तापाचे १,८९२ रुग्ण

मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कमी झालेल्या आजारांचा आलेख दुसर्‍या आठवड्यातही उतरता पाहायला मिळाला आहे. तापाचे १ हजार ८९२ रुग्ण ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे. 

ऑगस्ट महिन्यात कमी झालेल्या पावसाच्या बरोबरीनेच पावसाळी आजारही कमी होताना दिसत आहेत. ऑगस्ट २0१३ मध्ये तापाचे एकूण ८ हजार १00 रुग्ण आढळून आले होते. मात्र यंदा १७ ऑगस्टपर्यंत अध्र्याहून कमी म्हणजे ३ हजार ६२५ तापाचे रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यामध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये थोडीशी वाढ झालेली दिसून येत आहे. पहिल्या आठवड्यात मलेरियाचे २३५ रुग्ण आढळले होते, तर दुसर्‍या आठवड्यात २९२ रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्ट २0१३ मध्ये मलेरियाचे १ हजार ३0२ रुग्ण आढळून आले होते, मात्र यंदा दोन आठवड्यांमध्ये फक्त ५२७ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहे. 

दुसर्‍या आठवड्यामध्ये डेंग्यूचे फक्त १२ रुग्ण आढळून आले असून, पहिल्या आठवड्यात ४ रुग्ण आढळले होते. ऑगस्ट २0१३ मध्ये डेंग्यूचे ८७ रुग्ण आढळून आले होते. गॅस्ट्रोचे २७0 रुग्ण आढळले आहेत. टायफॉइडचे ३९, हिपॅटायटिसचे ४१, लेप्टोचे ६ रुग्ण आढळून आले आहेत; तर कॉलरा, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू याचा एकही रुग्ण आढळलेला नाही. 
ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात तापाचे १,८९२ रुग्ण 
आजार  ऑगस्ट २0१४  ऑगस्ट २0१३
ताप     ३,६२५          ८,१00
मलेरिया ५२७            १,३0२
लेप्टो     १0               १६
डेंग्यू     ८७               ३0
स्वाइन फ्लू  0              १0
गॅस्ट्रो    ५२६            १0६५
टायफॉइड  ७४             २0६
हिपॅटायटिस ८0             १७७
चिकनगुनिया  0             0
कॉलरा      १             १९

Post Bottom Ad

JPN NEWS