मुंबईकरांचा १ फेब्रुवारीपासून बसप्रवास महा गणार
मुंबई : मुंबईकरांचा बेस्टचा प्रवासही फेब्रुवारीच्या १ तारखेपासून महागणार आहे. सर्वसाधारण, मर्यादित, जलद आणि वातानुकूलित अशा सर्व बससेवांची भाडेवाढ होणार आहे. या भाडेवाढीमुळे सर्वसाधारण बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून ७ रुपये होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही भाडेवाढ करत असताना सध्याचे ३, ५, ७, ८, १५, २५, ३५ किमी हे भाडेटप्पे बेस्टने रद्द केले असून २, ४, ६, १0, १४, २0, ३0, ४0, ५0 किमी अशी भाडेटप्प्यांची नवीन फेररचना केली आहे. यामुळे कमी अंतरासाठी आता बेस्ट प्रवाश्याकढून जास्त रक्कम आकारली जाणार आहे.
या प्रवासभाड्यामध्ये सवलतीचे प्रवासभाडे वगळता रुपये २ किमीपर्यंतच्या तिकिटावर १0 पैसे व रुपये २ पेक्षा अधिक कि मतीच्या तिकिटावर १५ पैसे पोषण अधिभार अंतर्भूत असणार आहे. सामानावर आकारण्यात येणारे भाडे प्रौढ प्रवासभाड्याशी समतुल्य असेल, मात्र कमाल सामान भाडे सर्वसाधारण व र्मयादित बससेवांवर ३0 रुपये, जलद बससेवांवर ३५ आणि वातानुकूलित बससेवांवर १00 रुपये असणार आहे. महापालिका हद्दीबाहेरील बसप्रवासाकरिता दैनंदिन तिकिटावर सर्वसाधारण, र्मयादित आणि जलद बससेवांकरिता १ रुपया आणि वातानुकूलित बससेवेक रिता ५ रुपये अतिरिक्त प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. या भाडेवाढीमध्ये ३ वर्षांपर्यंतच्या बालकांना कोणतेही प्रवासभाडे आकारण्यात येणार नाही. ३ वर्षांवरील १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना सवलतीचे प्रवासभाडे आकारण्यात येईल. मात्र शालेय प्रवासाकरिता बसपास योजनेचा लाभ घेणे अनिवार्य आहे. वातानुकूलित बसगाड्यांव्यतिरिक्त इतर सर्व बससेवांवर दृष्टीहीन व्यक्तीकरिता प्रत्येक बसफेरीला सरसकट २ रुपये प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच मासिक बसपासचे मूल्य १00 रुपये तर त्रैमासिक बसपासचे मूल्य २00 रुपये असणार आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई हद्दीबाहेरील बसपासकरिता विना वातानुकूलित बससेवांवर ५0 रुपये, तर वातानुकूलित बससेवांवर १00 रुपये अतिरिक्त आकारण्यात येणार आहेत.
भाडेवाढ
(किमी) साधी बस मर्यादित जलद वातानुकूलित
२ ७ ७ ८ २५
४ १० १० १२ ३५
६ १३ १३ १६ ५०
१० १६ १६ २० ६०
१४ २० २० २५ ७०
२० २५ २५ ३० ९०
३० ३० ३० ४० ११०
४० ४० ४० ५० १३०
५० ५० ५० ६० १५०
६० ६० ६० ७० १७०
२ ७ ७ ८ २५
४ १० १० १२ ३५
६ १३ १३ १६ ५०
१० १६ १६ २० ६०
१४ २० २० २५ ७०
२० २५ २५ ३० ९०
३० ३० ३० ४० ११०
४० ४० ४० ५० १३०
५० ५० ५० ६० १५०
६० ६० ६० ७० १७०
बसपास
(किमी) बसभाडे मासिक त्रैमासिक
२ ७ ३०० ८५०
४ १० ४६० १२००
६ १३ ५९० १७००
१० १६ ७३० २०००
१४ २० ९०० २५००
२० २५ ११०० ३०००
(किमी) बसभाडे मासिक त्रैमासिक
२ ७ ३०० ८५०
४ १० ४६० १२००
६ १३ ५९० १७००
१० १६ ७३० २०००
१४ २० ९०० २५००
२० २५ ११०० ३०००
शाळा-कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी बसपास
बसपासचा प्रकार मासिक त्रैमासिक सहामाहीइयत्ता १0 वीपर्यंत १५0 ४५0 ७५0
इयत्ता १२ वीपर्यंत ३00 ९00 १५00
इयत्ता १२ वीपर्यंत ३00 ९00 १५00
इतर बसपास
बसपासचाप्रकार दैनंदिन मासिक त्रैमासिकमॅजिक ५0 १२00 ३५00
मॅजिक (एसी) १५0 ३५00 १0000
दृष्टिहिनांकरिता ---- १00 २00
फोर्ट फेरी ---- ४00 ११00
बसपासचाप्रकार दैनंदिन मासिक त्रैमासिकमॅजिक ५0 १२00 ३५00
मॅजिक (एसी) १५0 ३५00 १0000
दृष्टिहिनांकरिता ---- १00 २00
फोर्ट फेरी ---- ४00 ११00
