रिलायंस इन्फोकोमला 15 हजार रुपयांचा दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2015

रिलायंस इन्फोकोमला 15 हजार रुपयांचा दंड


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या मुलुंड टी वार्ड येथे चरी न बुजवनाऱ्या रिलायंस जिओ इन्फोकोम कंपनीकडून पालिकेने 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 


मुलुंडच्या टी विभागाच्या हद्दीत एलबीएस रोडवर कामगार हॉस्पिटल ते आर मॉल परिसरात रिलायंस जिओ इन्फोकोम या कंपनीने चरी खणल्या होत्या. रिलायंसचे काम वेळेवर होत नसल्याची आणि रस्त्यावर कामाचा कचरा टाकल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते आनंद परगावाकर यांनी पालिकेकडे केली होती. या तक्रारीरीची दखल घेत पालिकेने रिलायंसला वेळेवर काम पूर्ण न करणे, चरी न बुजवणे, पेव्हर ब्लॉक योग्य रित्या न बसवणे यासाठी 15 हजार रुपयांचा दंड बसवाला असून रिलायंस कडून हा दंड वसूल करण्यात आला असल्याचे पालिकेने पारगावकर याना कळविले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS