महापालिका आता ‘ट्विटर’ वर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2015

महापालिका आता ‘ट्विटर’ वर


मुंबई (प्रतिनिधी)- पावसाळी परिस्थिती विषयक, भरती-ओहोटी, आरोग्य आणि विशेष माहिती नियमितपणे उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेने ट्विटर सुरू केला आहे. यामुळे महापालिका क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात उपलब्ध होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी महापालिकेच्या ट्विटर हँडलला फॉलो करुन मुंबईशी संबंधित अधिकृत व विश्वसनीय माहिती प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.

भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला नागरी सेवा-सुविधा पुरविणारी महानगरपालिका मुंबईशी संबंधित माहिती अद्ययावत संवाद माध्यमांच्याआधारे वेळोवेळी व नियमितपणे नागरिकांना उपलब्ध व्हावी, यासाठी देखील कटिबद्ध आहे. आतापर्यंत संकेतस्थळ, मोबाईल ऍप्लीकेशन्स, लघुसंदेश, विशेष दूरध्वनी क्रमांक यासारख्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणारी माहिती आता दैनंदिन स्वरुपात ट्विटरवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महापालिकेच्या ट्विटर हँडलचे दर्शनी नांवबृहन्मुंबई मनपा MCGM असे असून संकेतस्थळाचा निश्चित पत्ता www.twitter.com/mcgm_bmcअसा आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS