मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईने महागड्या शहरांच्या यादीतील आपला क्रमांक कायम राखण्यात यश मिळवले. मुंबई देशभरातील महागडे शहर असताना जागतिक पातळीवर ६६ व्या क्रमांकावर आहे. ठिकाण, घर, वाहतूक, खाद्यान्न, वस्त्र, मनोरंजन आणि इतर घटकांवर जगभरातील २९७ शहरांचे सर्वेक्षण र्मकर या कंपनीने केले होते.त्याबाबतचा अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला. गृहनिर्माण क्षेत्रातील वाढते सिमेंट, कच्चा मालाचे दर, वाहतूक, महागाई, सेवा, भाडे आणि इतर घटकांवर मुंबईतील राहणीमान महागडे आहे. मुंबईनंतर जागतिक पातळीवर देशाची राजधानी नवी दिल्ली १३२, चेन्नई १५७, बंगळुरू १८३ आणि कोलकाता १९३ व्या स्थानावर आहे.
Post Top Ad
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

