'हिंदमाता' सिनेमाजवळ पाणी साचणारच - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 June 2015

'हिंदमाता' सिनेमाजवळ पाणी साचणारच - उद्धव ठाकरे


मुंबई / अजेयकुमार जाधव 
क्लिव्हलंड बंदर पर्जन्य उद्दंचन केंद्र आणि लव्हग्रो जल उद्दंचन केंद्रांचे भूमिपूजन करताना प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. या प्रकल्पाचे कंत्राटदार अवर्सेकर यांच्यावर नाराज होतो. परंतू या प्रकल्पात अनेक अडचणी आल्याचे समजते आणि सर्व अडचणीवर मात करून हे दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे आता कितीही मोठा पाऊस आला तरी या ठिकाणी पाणी तुंबणार नसल्याने मुंबईकर नागरिकांचा पैसा खोटा ठरणार नाही असा दावा करताना हिंदमाता परिसरात मात्र यावर्षीही ४० टक्के पाणी साचाणारच असे  शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते क्लिव्हलंड आणि लव्हग्रो पंपिंग स्टेशनच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते. 

२६ जुलै २००५ ला मुंबईत आलेल्या पुरा नंतर ब्रिमस्ट्रोवेडच्या माध्यमातून पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसारमध्यमाद्वारे नेहमी ओरड केली जाते मात्र हिंदमाता येथे पूर्वी तलाव होता हे कोणालाच माहित नाही. सखल भाग असल्याने या ठिकाणी पाणी तुंबते मात्र ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचे काम पूर्णत्वास आल्यावर हा परिसरही पानिमुक्त होईल असे ठाकरे यांनी सांगितले. यावर्षी मुंबईतील रस्त्यांचीही कामे चांगली आणि वेळेपूर्वी झाली असून लोकप्रतिनिधीबरोबर पालिकेतील अधिकारीही चांगले काम करत असल्याचे प्रशस्तीपत्र ठाकरे यांनी दिले. महापौर स्नेहल आंबेकर यांनी ब्रिटानिया पंपिंग स्टेशन नोव्हेंबर २०१५ पर्यंत तर गसदार बंदर पंपिंग स्टेशनचे काम मे  २०१६ पर्यंत पूर्ण ओअनर असल्याचे सांगितले. मोगरा आणि भांडूप पंपिंग स्टेशनसाठी भूसंपादनाचे काम प्लाम्बित असल्याचे सांगत त्यांनी यावर्षी मुंबईकरांना चांगले रस्ते उपलब्ध असल्याने पावसाळा आनंददायी होईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. 

Post Bottom Ad

JPN NEWS