फुकट्या प्रवाशांकडून परेची १२ कोटींची दंडवसुली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2015

फुकट्या प्रवाशांकडून परेची १२ कोटींची दंडवसुली

मुंबई : गेल्या महिन्यात फुकट्या, अनधिकृत आणि अनियमित प्रवाशांवर पश्‍चिम रेल्वेने कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल १२ कोटी ११ लाख रुपयांची दंड वसुली केली. अशा प्रवाशांमुळे प. रेल्वेचा महसूल बुडत असल्याचे आढळल्यानंतर गेल्या महिन्यात ही मोहीम हाती घेऊन, कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला.

गेल्या वर्षी मे महिन्याच्या तुलनेत ही दंड आकारणी १0.१४ टक्के जास्त आहे. या मोहिमेत आरक्षित तिकिटांचा गैरवापर केल्या प्रकरणी एक हजार २९५ खटले दाखल करून १५ लाख २९ हजार रुपये दंड आकारणी केली तसेच एक हजार ५५८ अनधिकृत फेरीवाले आणि भिकार्‍यांनाही पकडून त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यापैकी ४0 जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली. शिवाय १९0 तिकीट दलालांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS