आरटीई नाकारणाऱ्या शिक्षणमंत्री तावडे यांच्या हकालपट्टीसाठी निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2015

आरटीई नाकारणाऱ्या शिक्षणमंत्री तावडे यांच्या हकालपट्टीसाठी निदर्शने


मुंबई- शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शिक्षण हक्क अधिकार कायद्यातील तरतुदींना डावलून राज्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांचे हित करत आहेत. त्यासाठीच त्यांनी राज्यात पूर्व प्राथमिकच्या शिक्षणाच्या हक्काची जबाबदारी काही संस्थाचालकांच्या इशा-यावर नाकारली आहे. यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी अनुदानित शिक्षण बचाव समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. 


राज्याच्या इतिहासात अशा प्रकारे जबाबदारी नाकारण्याची घटना पहिल्यांदाच घडली असल्याचा आरोप अनुदानित शिक्षण बचाव समितीने केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थाचालकांसाठी राज्यातील कोटय़वधी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण हक्क नाकारणा-या शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणीही गुरुवारी आझाद मैदानात करण्यात आली.

अनुदानित शिक्षण बचाव समितीच्या वतीने शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. संस्थाचालकांच्या हितासाठीच शिक्षणमंत्र्यांच्या इशा-यावर प्राथमिकच्या २५ टक्के प्रवेशाची प्रक्रियाही बंद करण्यात आली असून ती तातडीने सुरू करावी, राज्यातील प्रत्येक अनुदानित, विनाअनुदानित, इंटरनॅशनल शाळांमध्ये शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राखीव जागांवरील प्रवेश न देणा-या संस्थाचालकांसह संबंधित शिक्षणाधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी या वेळी अनुदानित शिक्षण बचाव समितीचे कॉ. शैलेंद्र कांबळे यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS