पावसाळी परिस्थितीचा दैनंदिन अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2015

पावसाळी परिस्थितीचा दैनंदिन अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध


पालिकेच्या संकेतस्थळाला ८१ हजार नागरिकांची भेट
मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईतील पावसाच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी पालिकेने dm.mcgm.gov.in या संकेतस्थळ सुरू केले आहे. 1 जून पासून हे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर तब्बल 81 हजार नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. मुंबईचे स्थान व महत्त्व लक्षात घेता नागरिहिताच्या दृष्टीने मार्गदर्शनपर आणि महत्त्वाची माहिती व पावसाळी परिस्थितीचा दैनंदिन अहवाल या संकेतस्थळाच्या आधारे मिळत असल्याचे पालिकेने प्रसिध्दीपत्रकातून जाहीर केले आहे. 


यापूर्वी महापालिकेचे www.mumbaimonsoon.in हे संकेतस्थळ केवळ पावसाळ्याच्या ४ महिन्यांपुरते सुरू करण्यात येत होते. परंतु, मुंबईकरांना मुंबईशी संबंधित माहिती वर्षभर देता यावी, यासाठी १ जूनपासून dm.mcgm.gov.in नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. पालिका क्षेत्रातील ६० स्वयंचलित हवामान केंद्रे या संकेतस्थळाला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे दर 15 मिनिटाला पावसाळी परिस्थितीशी संबंधित माहिती प्रसारित होत आहे. त्याचबरोबर भरती-ओहोटी, वाहतूक, विभागवार संभाव्य धोकादायक ठिकाणे, वाऱ्याचा वेग, हवेचा दाब, वातावरणातील आर्द्रता, तपमान इत्यादी माहितीदेखील या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे. तसेच अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना, आपत्तीजन्य परिस्थितीत घ्यावयाची काळजी, दृकश्राव्य माध्यमातून प्रबोधनपर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. हे ऍप्लीकेशन गूगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहे. तसेच लवकरच ते ios वर देखील मोफत उपलब्ध होणार आहे. 


Post Bottom Ad

JPN NEWS