विविध मागण्या साठी आरोग्य सेविकांचे एक जुलै पासून काम बंद आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 June 2015

विविध मागण्या साठी आरोग्य सेविकांचे एक जुलै पासून काम बंद आंदोलन

मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिका आरोग्य सेविकांच्या मागण्या 30 जून 2015 पयॅत मान्य झाल्या नाहीत तर एक जुलै पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कमॅचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता याना दिलेल्या पत्रात केला आहे 

9 माचॅ 2015 रोजी तत्कालीन आयुक्तांनी मान्य केल्या प्रमाणे समितीचे गठण करून संघटनेची बाजु त्वरित ऐकून घ्यावी, सभावृत्तांत जोडलेले आहे 9 माचॅ 2015 पासून दोन महिन्यात समितीने काम पूर्ण करण्याचे मान्य करण्यात आले होते परंतु तीन महिने होऊन गेले तरी समितीची एक ही सभा झालेली नाही एक एप्रिल 2014 पासून माचॅ 2015 पयॅत वेतन वाढीची 12000 थकबाकी त्वरित दयावी ,150 घरांमध्ये फक्त आरोग्य सेविकांनी एबिट टाकण्याचे कामाबाबत प्रसृत केलेले परिपत्रक 19 मे 2015  कमांक 1997 मागे घेण्यात यावे , आरोग्‍य सेविकाना मासिक निवृत्ती वेतन तीन हजार रुपये देण्यात यावे, शैक्षणिक पात्रतेनुसार आरोग्य सेविकांना पालिकेच्या रिक्त पदावर विशेष प्राधान्य देऊन नियुक्त करण्यात यावे , आरोग्य सेविकाना आरोग्य विमा चालू करावा, आणि पालिका कर्मचाऱ्यांना मिळत असलेले सर्व सेवांचे फायदे , रजा , घरभाडे भत्ता, महागाई भत्ता देण्यात यावा या मागण्यासाठी औद्योगिक कलह अधिनियम 1947 च्या कलम 22 (1) अन्वये सव॔ आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका (chv) नी 15 जून 2015 रोजी झालेल्या सभेमध्ये या मागण्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र तीन महिने होऊन गेले तरी समितीची एक ही सभा झाली नाही त्यामुळे या मागण्या 30 जून 2015 पयॅत मान्य झाल्या नाहीत तर एक जुलै पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रकाश देवदास यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS