परेच्या स्थानकांमध्ये थांबणार्‍या जलद लोकलची माहिती इंडिकेटवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 June 2015

परेच्या स्थानकांमध्ये थांबणार्‍या जलद लोकलची माहिती इंडिकेटवर

मुंबई : स्थानकांमध्ये थांबणार्‍या जलद लोकलची माहिती इंडिकेटरच्या माध्यमातून प्रवाशांना देण्याची मध्य रेल्वेची सुविधा नजीकच्या काळात पश्‍चिम रेल्वेवरही सुरू होणार आहे. 'प.रे'च्या जलद लोकल कोणत्या स्थानकात थांबणार याची माहिती आजवर दिली जात नव्हती; पण प्रवाशांच्या रेट्यामुळे ही सुविधा लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.  
'परे'वर ज्या जलद लोकल स्थानकात थांबत नाहीत, त्यांची यादी इंडिकेटरवर झळकत असे; पण यापुढे यात बदल होणार आहे. याविषयी पश्‍चिम रेल्वेने प्रवाशांकडून जाहीर सूचना मागवल्या होत्या. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ७५ टक्के प्रवाशांनी 'इथे थांबणार' हा पर्याय निवडला. मध्य रेल्वेत ही पद्धत आधीच अवलंबण्यात आली आहे. प. रे.ने काही दिवसांपूर्वी फेसबुक, ई-मेल आणि एम इंडिकेटरच्या माध्यमातून प्रवाशांची मते जाणून घेतली असता, ७५ टक्के प्रवाशांनी जलद लोकल ज्या स्थानकात थांबतील त्याच स्थानकांची माहिती इंडिके टरवर दाखवण्यास अनुकूलता दाखवली आहे. ७५ टक्के म्हणजे, ५१ हजार ९९२ प्रवाशांनी लोकल थांबण्याची माहिती प्रदर्शित करण्याचे व २५ टक्के म्हणजे, १७ हजार १७८ प्रवाशांनी कोणत्याही बाजूने मत नोंदवले नाही. या नोंदीची पश्‍चिम रेल्वेने दखल घेतली असून, नजीकच्या काळात 'इंडिकेटर'वर हे बदल झालेले दिसतील, असे रेल्वेच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS