हिट and रन प्रकरणामधील आरोपी अग्निशमन दलाचा प्रमुख नको - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2015

हिट and रन प्रकरणामधील आरोपी अग्निशमन दलाचा प्रमुख नको

एससी, एसटी एम्प्लोईज असोसीएशनची मागणी 
मुंबई / प्रतिनिधी 
हिट and रन प्रकरणामध्ये अटक केलेले आणि सदर खटला व चौकशी प्रलंबित असतानाही मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी प्रभात रहांगदळे या उप प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्याला बसवण्याच घाट घातला जात आहे. रहांगदळे यांच्यावर हिट and रनचा खटला चालू असल्याने त्यांची अग्निशमनदल प्रमुखपदी  नेमणूक करू नये अशी मागणी बृहन्मुंबई महानगर पालिका एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी एम्प्लोईज असोसीएशनने महापौर, पालिका आयुक्त, यांच्याकडे केली आहे.

दिनांक २१ डिसेंबर २००५ रोजी मध्यरात्री स्वताच्या गाडीने एका रिक्षाला धडक देवून प्रभात रहांगदळे यांनी पळ काढला होता. २ मोटार सायकल वरील धाडसी तरुणांनी पाठलाग करून रहांगदळे यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या अपघातामध्ये ३५ वर्षीय रिक्षाचालक जनार्दन प्रसाद राजबहादूर शर्मा याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रहांगदळे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकारांची चौकशी सुरु असून न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना त्यांना अग्निशमन दलाचे प्रमुख पद दिल्यास लोकांमध्ये महानगर पालिका आणि अग्निशमन दलाची प्रतिमा मलिन होऊ शकते. यामुळे रहांगदळे यान अग्निशमन दलाचे प्रमुख पद देवू नये अशी मागणी बृहन्मुंबई महानगर पालिका एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी एम्प्लोईज असोसीएशनचे सरचिटणीस संजय कांबळे - बापेरकर यांनी महापौर, पालिका आयुक्त, सभागृह नेत्या, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, तसेच सर्वच पक्षाच्या गट नेत्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS