मुंबई अग्निशमन दलातील पदोन्नतीत आर्थिक भ्रष्टाचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2015

मुंबई अग्निशमन दलातील पदोन्नतीत आर्थिक भ्रष्टाचार


चौकशी करण्याची युनियनची मागणी 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील केंद्राधिकारी पदाची पदोन्नती करताना होणाऱ्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनचे सरचिटणीस सुखदेव काशीद यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. 

मुंबई अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना २४ तास डयुटी दिली जायची. कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितल्यावर ८ तास डयुटी करण्यात आली. न्यायालयाने मंजूर केलेल्या सर्व सवलती सर्व अधिकाऱ्यांनाही लागू करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आयुक्तांच्या मंजुरी नंतर लेखापाल यांनी ८ तास डयुटीच्या अटीवर प्रतिमाह नियमित मिळणाऱ्या विशेष भत्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त विशेष भत्ता मंजूर केला. सदर प्रस्तावाला स्थायी समिती व पालिका सभागृहाची मंजुरू मिळाली आहे. या ठरावानुसार अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना ८ तास डयुटी देण्याचे अपेक्षित असताना तत्कालीन अग्निशमन दल प्रमुख डी. एस. मुळे यांनी ८ तास डयुटीमध्ये भरती केलेले जेष्ठ सहाय्यक केंद्र अधिकारी आर. एन. अंबुलगेकर यांच्याकडून स्वेच्छा २४ तास डयुटी स्वीकारत असल्याचे सहमती पत्र लिहून घेतले. अंबुलगेकर यांची २४ तासाची डयुटी पुन्हा ८ तास करे पर्यंत नियम डावलून स्थायी समिती आणि सभागृहाने मंजूर केलेले भत्ते देण्यात आले आहेत. 

अश्या अधिकारयांना मोफत निवासस्थान, विद्युत सेवा, मोबाईल सेवा नियमबाह्य पद्धतीने पुरविली असली तरी त्याची माहिती पदोन्नती समिती पालिका अतिरिक्त आयुक्त, आयुक्त, प्रमुख लेखापाल यांना देण्यात आलेली नाही. नियमबाह्य व लपवाछपवीच्या प्रकारामुळे महापालिकेवर आर्थिक भर पडत असून नागरिकांच्या पैशांचा गैरवापर होत आहे. यामुळे या संपूर्ण गैरप्रकाराची चौकशी करून महानगरपालिकेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या खाते प्रमुख व प्रशासकीय अधिकारयांवर नियमानुसार कारवाई करावी  अशी मागणी मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनचे सरचिटणीस सुखदेव काशिद यांनी महापौर, पालिका आयुक्त, सभागृह नेत्या, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, प्रमुख लेखापाल, चोकशी अधिकारी व सर्व पक्षीय गटनेत्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे

Post Bottom Ad

JPN NEWS