बस थांब्यावरील अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईत अडचणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2015

बस थांब्यावरील अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईत अडचणी


मुंबई / अजेयकुमार जाधव 
बेस्ट बस थांब्यावर अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांचे फोटो ईमेल वर पाठवाल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे बेस्टने सांगितले असताना वास्तवात मात्र तक्रार केल्यावर मात्र जनसंपर्क अधिकारी, वाहतूक शाखा, बेस्ट डेपो व्यवस्थापक व नंतर संबधित पोलिस स्टेशन असा प्रवास करत येणाऱ्या तक्रारी दरम्यान संबंधित वाहन त्या बस थांब्यावर मिळत नसल्याने अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास अडचणी निर्माण होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 


मुंबईमध्ये वाढत्या वाहनाच्या संखेमुळे वाहनांच्या पार्किंगची समस्या वाढली आहे. मुंबईमध्ये वाहने कुठेही कशीही उभी केली जातात. या मुले रहदारीला अडचणी निर्माण होत आहेत. अश्याच अडचणी बेस्ट प्रशासनाला येवू लागल्या आहेत. बेस्टच्या बस थांब्यावर कश्याही प्रकार वाहने उभी केल्याने बेस्ट बस थांब्यावर उभ्या करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. बस थांब्यावर व थांब्याच्या बाजूला १५व मीटर परिसरात वाहने उभी करता येत नाहीत. अशी वाहने उभी केल्यास त्यांच्यावर १०० रुपये दंड आकारला जातो. परंतू बस थांब्यावर वाहने सर्रास उभी केली जात असल्याने प्रवाश्यांना बस मध्ये चढताना, उतरताना तसेच बस थांब्यावर उभी करता येत नाही.  या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बेस्टने बस थांब्याजवळ उभ्या असणाऱ्या वाहनांचे फोटो काढून जनसंपर्क अधिकाऱ्यांना इमेल द्वारे कळवण्याचे आवाहन मे २०१५ मध्ये केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईमधून तब्बल ११० तक्रारी दाखल झाल्या आहेत. जनसंपर्क अधिकार्यांकडे येणाऱ्या या तक्रारी बेस्टच्या वाहतूक विभागाकडे पाठवण्यात येतात. तेथून या तक्रारी संबंधित डेपो कडे पाठवण्यात येतात डेपो व्यवस्थापक याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली जाते व नंतर वाहनावर कारवाई केली जाते. पोलिसांकडून कारवाई केली जात असताना संबंधित वाहन त्या बस थांब्यावर मिळत नसल्याने बेस्टकडे तक्रार करूनही कारवाई करण्यास मात्र अडचणी येत आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS