जून महिन्यात १४,७६४ अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2015

जून महिन्यात १४,७६४ अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई


मुंबई / प्रतिनिधी 
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहरपल्लवी दराडे यांच्या निर्देशांनुसारउपायुक्त बापु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रशासकीय विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेद्वारे नियमित स्वरुपात धडक कारवाई करण्यात येत आहेया अंतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील सबवे व परिसरदादरकुर्लावांद्रेघाटकोपरबोरीवलीअंधेरीकांजूर मार्ग,विक्रोळीचर्नी रोडरे रोड येथील परिसरांमध्ये व प्रामुख्याने रेल्वे स्थानकांच्या परिसरात वारंवार कारवाई करण्यात येत असल्याने सदर परिसर अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त झाल्याने पादचाऱयांना दिलासा मिळाला आहेतसेच संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये दिनांक १ जून ते २६ जून २०१५ या कालावधीत एकूण १४,७६४ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व परिसरात व विशेषकरुन रेल्वे स्थानक परिसरात विशेष मोहिम सातत्याने राबविण्याचे निर्देश देण्यात आले होतेत्यानुसार महापालिकेच्या सर्व २४ विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर नियमित स्वरुपात कारवाई करण्यात येत आहेया अंतर्गत चर्चेगेट सबवे व चर्चगेट स्थानकालगतच्या १५० मीटर्सच्या परिसरामधील ६३ अनधिकृत फेरीवाले हटविण्यात आले आहेततसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकालगतचा १५० मीटर्सचा परिसर व सबवे येथे देखील १२९ फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करुन त्यांना हटविण्यात आले आहेदिनांक १ जून ते २६ जून या कालावधीत 'विभागातील एकूण ११७६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली

Post Bottom Ad

JPN NEWS