काळ्या यादीतील कंपनीला बेस्टच्या जहिरातीचा ठेका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2015

काळ्या यादीतील कंपनीला बेस्टच्या जहिरातीचा ठेका

आयुक्तांनी कारवाई करण्याची मनसेची मागणी
मुंबई  /  प्रतिनिधी
मुंबईची दूसरी लाइफलाइन असलेल्या बेस्टने एका काळ्या यादीतील कंत्राटदाराला जाहिरातीचा ठेका दिल्याचे उघड झाले असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकड़े केली आहे.

पालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघत असताना निघत असताना बेस्ट प्रशासनानेही काळ्या यादीतील में. कृष्णा कम्युनिकेशन या कंपनीला 72.77 कोटी रुपयांचा ठेका दिला आहे. कृष्णा कम्युनिकेशन या कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतुक महामंडलाने काळ्या यादीतील कंत्राटदाराला कोणतेही कंत्राट मिळू नये यासाठी परिपत्रक काढून राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतुक सेवा पुरवणारया संस्थाना कळविले होते. परंतू या परिपत्रकाकडे बेस्ट प्रशासनाने दुर्लक्ष करून कंत्राट दिल्याने या जाहिरातीच्या ठेक्याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी लांडे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS