बेस्टची बसची पुलाला टक्कर - ड्रायव्हर जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2015

बेस्टची बसची पुलाला टक्कर - ड्रायव्हर जखमी


मुंबई / प्रतिनिधी 
मुलुंड वैशाली नगर ते वरळी डेपो या मार्गावर चालणाऱ्या २७ नंबरच्या बसने गुरुवारी सकाळी ९.३० वाजता किंग्जसर्कल येथील पुलाच्या एका उंच कमानीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातावेळी बसच्या धडकेने किंग्ससर्कल येथील पुलाचा भाग बसवर पडल्याने बस ड्रायव्हर तानाजी शंकर काळे ( ३०) हा चालक जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आल्याची समजते. गेल्या काही दिवसात बसमधून ग्यास लिकेज झाल्याच्या घटना घडत असताना गुरुवारी बसने पुलाला धडक दिल्याने बेस्टमधील प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS