जकात माफियांची मानखुर्द नाक्यावर दहशत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2015

जकात माफियांची मानखुर्द नाक्यावर दहशत


जकात अधिकाऱ्यांच्या अपयशाचे खापर मानखुर्द पोलिसांच्या डोक्यावर 
मुंबई / रशिद इनामदार 
जकात माफिया दिवसेंदिवस अधिकाऱ्यांच्या व पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत . मानखुर्द जकात नाक्यावर त्यांनी दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे या नाक्यावरील अधिकाऱ्यांना दहशतीच्या सावटाखाली काम करावे लागत आहे . मागील महिन्यात या जकात माफियांनी एका अधिकाऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले . दुसऱ्यांदा अधिकाऱ्यांना घेराव घालून जकात न भरता ३ कंटेनर पळवून नेले.जकात माफियांमुळे त्रस्त झालेल्या जकात अधिकाऱ्यांनी मात्र या अपयशाचे खापर मानखुर्द पोलिसांवर फोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. 

दि २५ जून च्या पहाटेच्या सुमारास पर्यवेक्षक निरीक्षक शेषेराव नसरू राठोड व इतर जकात अधिकारी कर्तव्यावर असताना जकात माफियांच्या टोळीने त्यांना घेराव घातला व आपले ३ कंटेनर जकात न भरताच पळवून नेले. घेराव घातलेल्या टोळीचा प्रमुख तथाकथित स्थानिक राजकीय  पुढारी असल्याचे कळते. पळवून नेलेले कंटेनर विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नंतर पकडण्यात आले .मानखुर्द जकात नाक्यावरील अधिकारी घडल्या प्रकाराबद्दल तक्रार करण्यासाठी मानखुर्द पोलिस ठाण्यात गेले . कर्तव्यावर असलेले  पोलिस निरीक्षक चांदेकर व पोलिस उपनिरीक्षक कावळे यांनी या प्रकरणाबद्दल माहिती विचारली . ती माहिती जकात अधिकारी सुसंगतपणे मांडू शकत नव्हते . हा गुन्हा जकात नाक्याजवळ असलेल्या पोलिस चौकी जवळ घडला असल्याचे जकात अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यानुसार जकात नाका चौकीवर कर्तवयावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक भोसले यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली . भोसले यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले . एकंदरीत जकात अधिकारी प्रकरणावर प्रकाश टाकण्यात अपयशी ठरले . तरीदेखील पोलिस निरीक्षक चांदेकर यांनी जकात अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देण्याची विनंती केली . तशी नोंद पोलिस ठाण्याच्या रोजनिशीत नोंद देखील केली .मात्र जकात अधिकाऱ्यांनी अशी तक्रार देखील दिली नाही .

या प्रकरणाची बातमी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यावर मात्र पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी चौकशी सुरु केल्याची चर्चा आहे . मुळात या प्रकरणी जकात अधिकारी व त्यांच्या सुरक्षा रक्षक यांना जकात माफियांना रोखण्यात अपयश आले आहे . मात्र  मानखुर्द पोलिसांवर दोषारोप करून त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रकार सुरु केला असल्याची माहिती एका विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे .अधिक माहितीसाठी मानखुर्द तसेच विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी बदलीचे कारण पुढे केले .
----------------------------

आमच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून उरण , न्हावाशेवा येथून आलेले कंटेनर माफियांनी पळवले . त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून ३ ही कंटेनर चे क्रमांक दिले. त्यापैकी एक कंटेनर विनोबा भावे नगर पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे . त्याची अजून चौकशी सुरु झालेली नाही . कंटेनर चे मालक किंवा ज्यांचा माल होता त्यापैकी कोणी नाही आले अजून . अधिकारी मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेले होते पन त्यांची तक्रार घेतली नाही . वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी खात्याने पत्रव्यवहार केला आहे . येउन फिर्याद दाखल करा असे त्यांचे आज पत्र आले आहे . ………….
गुरव , जकात अधिकारी
---------------------------

माफियांनी केला होता अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला 
कमलाकर बडाळे  (३२) या अधिकार्यावर ९ जून रोजी जकात माफियांनी प्राणघातक हल्ला केला होता . त्यात त्यांच्या कपाळावर , पाठीवर व खांद्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या . या प्रकरणात बडाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार २ अज्ञात मारेकारांविरोधात गुन्हा नोंद आहे . त्याचा तपास मानखुर्द पोलिस करत आहेत 

Post Bottom Ad

JPN NEWS