मुंबई अग्निशमन दलाची विशेष पाहणी मोहीम - 308 इमारतींना नोटीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2015

मुंबई अग्निशमन दलाची विशेष पाहणी मोहीम - 308 इमारतींना नोटीस

मुंबई  29 Sep 2015 ( प्रतिनिधी ) -  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे अग्नि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष पाहणी मोहीम राबविण्यात येत असून.या अंतर्गत जुलै  ते सप्टेंबर २०१५ या कालावधी दरम्यान महापालिका क्षेत्रातील उंच इमारती  अति उंच व   व्यावसायिक इमारती यांच्यासह मॉल्स, हॉटेल्स अशा ५०७ इमारतींची पाहणी करण्यात आली. यापैकी ३०८ इमारतींना अग्निसुरक्षा विषयक त्रुटी असल्यामुळे नोटीस बजावण्यात आल्या आहेत . तर ७३ ठिकाणी त्रुटींबाबत संबंधितांनी यथोचित कार्यवाही केली आहे २७८ ठिकाणी त्रुटींबाबत यथोचित कार्यवाही करण्यास्तव नियमांनुसार योग्य ती मुदत दिली आहे तसेच अपेक्षित कार्यवाही मुदती दरम्यान पूर्ण करण्यात येईल अशी हमी संबंधितांद्वारे देण्यात आली आहे. तथापि, अपेक्षित कार्यवाही मुदती दरम्यान पूर्ण न झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक व जीवसुरक्षा अधिनियम २००६ नुसार कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे पालिका अग्निशमन दलाने कळविले आहे

अग्निशमन दलाच्या विशेष मोहीम अंतर्गत  ३ ठिकाणी अग्निसुरक्षा त्रुटी विषयक संबंधित बाबींची प्रतिपूर्ती न झाल्याने संबंधितांवर महापालिकेच्या विधी विभागाद्वारे कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे संबंधित नियामांनुसार देण्यात आलेल्या मुदती दरम्यान संबंधितांनी अपेक्षित कार्यवाही न केल्यास त्यांना नोटीस  स्मरणपत्र देण्यात येईल. त्यानंतर देखील नमूद करण्यात आलेल्या त्रुटींबाबत प्रतिपूर्ती न झाल्यास संबंधित इमारतींचा पाणी पुरवठा  विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात येईल. एच  पश्चिम विभागातील ११ मॉल्सला नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

यामध्ये खालील मॉल्सचा समावेश आहे :
लिंक स्क्वेअर मॉल, वांद्रे (पश्चिम)
लिंक कॉर्नर मॉल, खार (पश्चिम)
क्रीस्टल शॉपर्स पॅराडाईज मॉल, खार (पश्चिम)
श्रीजी प्लाझा, खार (पश्चिम)
न्यू ब्युटी सेंटर, वांद्रे (पश्चिम)
केनिल वर्थ मॉल, वांद्रे (पश्चिम)
हायलाइफ मॉल, सांताक्रूझ (पश्चिम)
रिलायन्स हायपर मॉल, वांद्रे (पश्चिम)
मे. सबर्बिया मॉल, वांद्रे (पश्चिम)
मे.रिलायन्स ट्रेन्ड्झ मर्यादित, वांद्रे (पश्चिम)
मे. ग्लोबस स्टोअर्स प्रा.लि., वांद्रे (पश्चिम)

काही इमारतींमध्ये आगीच्या घटना घडल्यानंतर ज्या ठिकाणी अग्निसुरक्षा विषयक संबंधित नियमांचे पालन योग्य प्रकारे झाले नसल्याचे तसेच अग्नी सुरक्षा विषयक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे आढळून आले होते, अशा ५ इमारतींचा पाणी पुरवठा / विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामध्ये बाटा शू लिमिटेड गाला कमर्शियल, वांद्रे लिंकिंग रोडवरील केएफसी मॉल, अंधेरी-कुर्ला मार्गावरील प्रमुख प्लाझा, मालाड (पश्चिम) परिसरातील पाम स्प्रींग इमारत व चेंबूर येथील डॉ. सुराणा नर्सिंग होम यांचा समावेश होता.वरील ५ इमारतींपैकी अंधेरी कुर्ला मार्गावरील ‘प्रमुख प्लाझा’ ही इमारत वगळता इतर ४ इमारतींमध्ये अपेक्षित कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.    खालील इमारतींबाबत संबंधित नियमांनुसार अपेक्षित असणारी कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे :
केनिल वर्थ मॉल, वांद्रे (पश्चिम)
प्रमुख प्लाझा, अंधेरी कुर्ला मार्ग
पारेख मार्केट, ऑपेरा हाऊस

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages