हो आम्ही शस्त्र चालवन्याचे प्रशिक्षण देतो सनातनची कबुली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2015

हो आम्ही शस्त्र चालवन्याचे प्रशिक्षण देतो सनातनची कबुली

मुंबई /अजेयकुमार जाधव / 29 Sep 2015 
आम्ही आमच्या साधकाना शस्त्र चालवन्याचे प्रशिक्षण देतो अशी कबुली देत असे प्रशिक्षण आम्ही स्वसंरक्षणसाठी आणि चैन चोरिच्या घटना घडल्यास प्रतुत्तर देण्यासाठी प्रशिक्षण देतो असे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकाराना सांगितले.

सनातन संस्थेने शाम मानव यांच्या विरोधात मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वर्तक बोलत होते. यावेळी बोलताना वर्तक यांनी चैन चोरी झाल्यास एयर गन आणि रिव्हाल्वरने कसा मुकाबला केला जाऊ शकतो याबाबतचे स्वसरक्षणासाठी प्रशिक्षण दिले जाते असा खुलासा वर्तक यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी नक्षलवादाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत वकिलांचा सल्ला घेतला जात असल्याचे वर्तक यांनी सांगितले. शाम मानव यांनी समोहन करून सनातन संस्था बोम्बस्फोट करते आणि मग नंतर त्याव्यक्तीची स्मरणशक्ती फुसली जाते. हा आरोप शाम मानव यांनी सिद्ध करावा अन्यथा सनातन संस्थेची जाहिर माफ़ी मागावी असे आव्हान वर्तक यांनी यावेळी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages