तोटा भरून काढण्यासाठी बेस्ट बस जाहिरातींनी रंगणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2015

तोटा भरून काढण्यासाठी बेस्ट बस जाहिरातींनी रंगणार

मुंबई : 29 Sep 2015
सध्या बेस्टचा परिवहन विभाग तोट्यात आहे. हा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासन सध्या विविध पावले उचलत आहे. रेल्वेच्या लोकलवर लावलेल्या जाहिरातीप्रमानेच बेस्टच्या गाड्यांवर जाहिराती लावण्यात येणार आहेत. यामधून बेस्टला तीन वर्षांसाठी ७२ ते ७५ कोटी रुपये मिळतील, असा अंदाज बेस्टतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. 

या आधी बेस्टच्या अध्र्याच भागात जाहिराती लावण्यात येत होत्या. याबरोबरच बेस्टच्या वतीने कॉर्पोरेट, खाजगी कंपन्यांसाठी बेस्ट भाड्याने देण्याची सुविधाही सुरू करण्यात येणार असल्याचे बेस्टतर्फे सांगण्यात आले. बेस्टकडे सध्या ४0२३ बसेस आहेत. या सगळ्या बसेसवर जाहिराती लावण्यात येणार आहेत. बसच्या खिडक्या, काचा असलेल्या भागांवर जाहिराती लावण्यात येणार नसल्याचेही सांगण्यात आले. सध्या बेस्टच्या ताफ्यात सिंगल डेकर बसची संख्या जास्त आहे. या बसेसवर जाहिराती करताना पूर्वी एका विशिष्ट र्मयादेपर्यंत परवानगी होती; परंतु नव्या नियमानुसार संपूर्ण बेस्ट बस जाहिरातींनी रंगणार आहे. या बसेसवर जाहिराती लावण्याचे काम सध्या सुरू आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS