अंदमानचे माजी राज्यपाल प्रा. राम कापसे यांचे दीर्घ आजाराने निधन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2015

अंदमानचे माजी राज्यपाल प्रा. राम कापसे यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई / प्रतिनिधी / 29 Sep 2015
अंदमानचे माजी नायब राज्यपाल,तथा ज्येष्ठ भाजप नेते प्रा.राम कापसे यांचे आज आजाराने निधन झाले. कल्याण येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते.यांच्या निधनाने भाजपने जुना नेता गमावला आहे.यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११ वाजता निघेल,असे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले.

ठाणे जिल्यात त्यांचा राजकीय दबदबा होता.रुपारेल कॉलेजमध्ये ते मराठी साहित्य विभागाचे प्रमुख म्हणून होते. १९८९ ते १९९६ या काळात ते लोकसभेचे सदस्य होते,१९८५ ते १९८९ अशी चार वर्षे ते विधानसभेतभाजप चे नेते होते.अंदमानला त्सुनामीच्या काळात त्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे.२००४ ते २००६ या काळात त्यांनी अंदमान आणि निकोबारचं नायब राज्यपालपद भुषविलं.

आदर्श हरपला - दानवे पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते राम कापसे यांच्या निधनाने आज भाजपाच्या नव्या पिढीसमोरील आदर्श हरपला अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राम कापसे म्हणजे विचारांशी कटाबध्द असलेले व्यक्तीमत्व होते. जनतेला जनसंघापासून भाजपाच्या वेगळ्या कार्यपध्दतीची जाणीव झाली ती राम कापसे यांच्या सारख्या लोकप्रतिनिधीमुळे आणि त्यांच्या कार्यशैलीमुळे. आणि म्हणूनच एक कार्यक्षम लोकाभिमुख, लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख राहिली.

नगरसेवक, आमदार, खासदार, राज्यपाल अशा विविध जबाबदा-या त्यांनी संभाळताना सर्वसामान्य माणसाचा विकास हाच केंद्रबिंदु ठेवला. त्यातूनच त्यांनी आपल्या कार्यशैलीने वेगळा ठसा निर्माण केला. आज त्यांच्या निधनाने पक्षातील नव्या पिढीसमोरील आदर्श हरपला आहे, असेही दानवे शेवटी म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages