विमानतळावरील पुतळ्याचे अनावरण म्हणजे शिवसेनेचा पब्लिसीटी स्टंट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2015

विमानतळावरील पुतळ्याचे अनावरण म्हणजे शिवसेनेचा पब्लिसीटी स्टंट


मुंबई / 29 Sep 2015 / प्रतिनिधी
जीव्हीके या कंपनीच्या हट्टापोटी गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिवसेनेने लपत छपत केलेले अनावरण म्हणजेपब्लिसीटी स्टंट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. जीव्हीके आणि शिवसेनेची ही मिलीभगत असून आगामी महापालिकानिवडणुकीत श्रेय मिळवण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न अगदीच लाजिरवाणा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच अवघ्या देशासाठी प्रेरणास्थान असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचेअनावरण समारंभपुर्वक झाले पाहिजे अशी भुमिका मांडत मा. अहिर यांनी लवकरात लवकर समारंभपुर्वक छत्रपतींच्या या पुतळ्याचे अनावरण करण्याची मागणी जीव्हीके या कंपनीकडेकेली आहे. अन्यथा येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस जीव्हीके विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

मुंबई विमानतळाच्या नुतनीकरण आणि व्यवस्थापनाचे कंत्राट मिळालेल्या जीव्हीके या खाजगी कंपनीच्या वतीने विमानतळाच्या आवारात टर्मिनल टू परिसरात छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र शिवाजी महाराजांचा उभा पुत‌ळा करण्याऐवजी या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असायला हवा होता, असे मत अनेक मान्यवरांनीव्यक्त केले होते. या पार्श्वभुमीवर नव्याने छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणीही शिवप्रेमींकडून सातत्याने होत होती. त्यामुळे छत्रपतींचा पुतळा उभारून सहा महिने उलटूनगेल्यानंतरही पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नव्हते. अखेर नव्या पुतळ्याचा खर्च नको म्हणून जीव्हीके कंपनीनेच शिवसेनेशी संगनमत करून पब्लिसीटी स्टंट करत या पुतळ्याचेअनावरण करवून घेतल्याचा आरोप मा.श्री. सचिन अहिर यांनी केला आहे. मात्र शिवसेनेचा हा डाव आता उघड झाल्याचे सांगत छत्रपतींच्या पुतळ्याचे समारंभपुर्वक अनावरण करण्याचीमागणी त्यांनी केली आहे. तसेच लवकरात लवकर हे भव्य स्वरूपाचे अनावरण न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जीव्हीके विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा सज्जड इशाराही अहिर यांनी यावेळी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS