गिरणी कामगारांचे २ ऑक्टोबर रोजी 'मूक निदर्शने आंदोलन' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2015

गिरणी कामगारांचे २ ऑक्टोबर रोजी 'मूक निदर्शने आंदोलन'

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत पूर्वीप्रमाणेच फसवणूक करण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने अवलंबले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी 'भारतमाता सिनेमा' लालबाग, परळ येथे दुपारी ३ वाजता गिरणी कामगार व वारसदारांच्या वतीने काळ्या फिती लावून २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मूक निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती गिरणी कामगार एकजूट यांच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 


२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी गिरणी कामगारांच्या सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघ, मुंबई गिरणी कामगार युनियन (आयटक), गिरणी कामगार सेना, गिरणी कामगार सभा, एन.टी.सी.एस. / टी. असोसिएशन या सहा संघटनांच्या 'गिरणी कामगार एकजूट' यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात असल्याचे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर येऊन जवळपास एक वर्ष होत आले, तरी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर कुठलेही न्याय देणारे धोरण जाहीर केलेले नाही. विरोधी पक्षात असताना याच सरकारने तत्कालीन सरकारच्या गिरणी कामगारांच्या घराबाबतच्या धोरणावर टीका करून धोरणाचे लाभार्थी गिरणी मालक व विकासकांकडून गिरणी कामगारांच्या घरांची किंमत वसूल करून गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची मागणी केली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages