परेचे उपनगरीय मार्गाचे नवे वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2015

परेचे उपनगरीय मार्गाचे नवे वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये


मुंबई : 29 Sep 2015 
परेवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचे १ ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक लागू होणार आहे. पश्‍चिम रेल्वेच्या नव्या वेळापत्रकात लांब पल्ल्याच्या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्यात आला असला तरी उपनगरीय लोकल मार्गाचे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यानंतर लागू होणार आहे.

पश्‍चिम रेल्वेवर लागू होणार्‍या नव्या वेळापत्रकाचे उद््घाटन परेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी मंगळवारी केले. या वेळी त्यांनी नव्या वेळापत्रकात लांब पल्ल्याच्या मार्गावरील ४२ गाड्यांचा वेग वाढविण्यात आला असल्याची माहिती दिली. विरार-अहमदाबाद या मार्गावर गाड्यांचा वेग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या वेळेत बचत होणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. यामुळे लोकलच्या वेळापत्रकात काही प्रमाणात फरक पडेल, अशी अपेक्षा केली जात आहे, तर परेवरील सदोष ३0९ व्हील सेटप्रकरणी चौकशी करणार असल्याचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी सांगितले. पश्‍चिम रेल्वे मार्गावर २ मोठे अपघात झाले आहेत.

२८ जून रोजी चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मवर चढली होती, तर अंधेरी-विलेपार्ले स्थानकादरम्यान लोकलचे ७ डबे रेल्वे रुळांवरून खाली घसरले होते. पहिला अपघात हा मानवी चुकांमुळे झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच दुसरा अपघात हा लोकलच्या चाकांमधील एक्सेल तुटल्यामुळे झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असले तरी त्याची चौकशी मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरू असून तुटलेले चाक हे आरडीएसओकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच पश्‍चिम रेल्वे मार्गावरील १४५ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी ४५ प्लॅटफॉर्मची उंची वाढवून झाली असून उर्वरित प्लॅटफॉर्मची उंची मार्च २0१६ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच परेवरील एसी लोकल ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात रेल्वेच्या ताफ्यात येण्याची शक्यता असली तरी तिची चाचणी होण्यासाठी किमान ३ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी एसी लोकल जानेवारी २0१६ मध्येच धावू शकेल, असा विश्‍वासही अग्रवाल यांनी या वेळी व्यक्त केला. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages