पोलिसांच्या शासकीय घरांची माहिती संकेतस्थळावर टाका - राज्य माहिती आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2015

पोलिसांच्या शासकीय घरांची माहिती संकेतस्थळावर टाका - राज्य माहिती आयुक्त

मुंबई / अजेयकुमार जाधव / 30 Sep 2015
मुंबई पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिसांना घरासाठी अर्ज करूनही वर्षानुवर्षे घरे मिळत नसल्याने माहिती आयोगाने पोलिसांना देण्यात येणाऱ्या घरांची तसेच ज्या पोलिसांनी अर्ज केले आहेत अश्या सर्व पोलिसांची माहिती संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई पोलिस दलात काम करणारे कर्मचारी सणासुदीच्या काळात दिवस रात्र बंदोबस्तावर असतात.त्यांना आपल्या कुटुंबियांना सोडून अमर्याद काळासाठी कर्तव्य बजावावे लागते. त्यांना ज्या सोयी सुविधा आणि तुटपंजा पगार मिळतो याबाबत कोणीही जास्त वाच्यता करत नाहीत. त्यांना होणारा त्रास आणि व्यथा मांडण्याची सक्षम पर्यायी व्यवस्था नाही. अशी परीस्थी असताना पोलिसांनी आपल्याला घरे मिळवीत म्हणून अर्ज करूनही वर्षानुवर्षे त्यांना घरे देण्यात येत नाहीत. 

याबाबत सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ते निशांत घाडगे मुंबई पोलिस आयुक्तांच्या कक्ष ८ कडून आरटीआय मधून पोलिसांच्या घराबाबत सविस्तर माहिती मागवली होती. पोलिसांच्या घराबाबत माहिती देण्यात येत नसल्याने अपिल दखल करूनही आरटीआयमध्ये माहिती देण्यात आली नसल्याने घाडगे यांनी राज्य माहिती आयोगाकडे ८ / १२/ २१४ रोजी अपील दाखल केले होते. या अपिलाची सुनवाई नुकतीच आयोगाकडे झाली. 

या सुनवाई दरम्यान पोलिसांना शासकीय निवासस्थान देण्याबाबत माहिती दिली नसल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांना शासकीय निवास्थान मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची प्रतीक्षा यादी आणि शासकीय निवासस्थानात राहणारे अधिकारी कर्मचारी यांची माहिती दोन महिन्याच्या आत पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर टाकावेत असे आदेश माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी दिले आहेत.  

Post Bottom Ad

JPN NEWS