मुंबईकरांनी नियमित रक्तदाते होण्याची गरज - डॉ. केसकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2015

मुंबईकरांनी नियमित रक्तदाते होण्याची गरज - डॉ. केसकर

मुंबई : राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त 'रक्तदाता आशेचा किरण आहे, नियमित रक्तदाता व्हा' या संकल्पनेवर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत १ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनाच्या निमित्ताने निरोगी व्यक्तींनी आणि खास करून मुंबईकरांनी केवळ एकदाच रक्तदानासाठी येऊन चालणार नाही, तर नियमित रक्तदाता होण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालिका डॉ. पद्मजा केसकर यांनी केले. 
इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन आणि इम्युनोहीमॅटोलॉजीद्वारे ऐच्छिक रक्तदान दिवस १ ऑक्टोबर १९७५ रोजी आयोजित केला गेला होता. त्यानंतर दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस म्हणून केंद्र सरकारतर्फे साजरा केला जातो. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ऐच्छिक रक्तदानास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सध्या मुंबईला दरवर्षी अंदाजे तीन लाख युनिट रक्ताची आवश्यकता आहे. यासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या पुढाकारातून मुंबईतील ५७ शासनमान्य रक्त्पेढय़ांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. २0१४ मध्ये मुंबईत २ हजार ५४३ रक्तदान ऐच्छिक शिबिरे आयोजित केली गेली होती. यमाध्ये सुमारे २ लाख ७८ हजार जणांनी रक्तदान केले. मुंबईमध्ये ऐच्छिक रक्तदानाबाबतचा प्रचार आणि जनजागृती यामुळे ऐच्छिक रक्तदात्यांच्या प्रमाणात वाढ होऊन ते ९३.७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे रक्तसंक्रमणाद्वारे होणार्‍या आजारांच्या प्रमाणांमध्ये घट झाल्याचे आढळून आले आहे. प्राप्त रक्त युनिटपैकी ८७ टक्के रक्त युनिटचे पॅक्ड सेल, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, क्रायोप्रेसिपिटेट इत्यादीरक्त घटकांत विभाजन केले गेले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS