राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्क्यांनी वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्क्यांनी वाढ

Share This
मुंबई / महान्यूज : राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून 01 जानेवारी 2015 पासून महागाई भत्त्याच्या दरात 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाने 15 ऑक्टोबर 2015 रोजी निर्गमित केला आहे. 


महागाई भत्त्याचा दर आता 107 टक्क्यांवरून 113 टक्के झाला आहे. 01 जानेवारी 2015 पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावर महागाई भत्त्याचा हा दर लागू असेल. 01 ऑक्टोबर 2015 पासून वाढीव महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्यात येईल. शिवाय 01 जानेवारी 2015 ते 30 सप्टेंबर 2015 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०१५१०१५१३०५१६६२०५ असा आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages