महागाई भत्त्याच्या दरात 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2015

महागाई भत्त्याच्या दरात 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय

मुंबई / प्रतिनिधी - दि. 01 जानेवारी, 2015 पासून महागाई भत्त्याच्या दरात  6 टक्के वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाने दि.15 ऑक्टोबर, 2015 रोजी निर्गमित केला आहे. या माध्यमातून राज्य शासनाने शासकीय कर्मचा-यांना दिवाळीची भेट दिली आहे. आता महागाई भत्त्त्याचा दर 107 टक्यावरून 113 टक्के झाला आहे.दि. 01 जानेवारी, 2015 पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावर महागाई भत्त्याचा हा दर लागू असेल. दि. 01 ऑक्टोबर, 2015 पासून वाढीव महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्यात येईल व दि. 01 जानेवारी, 2015 ते दि 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

Post Bottom Ad

JPN NEWS