पालिका करणार 23 कोटी 65 लाखाचे सिमेंट काॅकीटचे रर-ते
मुंबई 5 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - मुंबईतील रस्ते मजबूत व चकाचक करण्यासाठी पालिका आता पुढे सरसावली आहे . त्यासाठी टप्प्याटप्प्याने मुंबईतील सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पावसाळा संपताच मुंबईतील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण वेगाने सुरू होईल. पश्चिम उपनगरातील रस्त्यांची कामे आधी हाती घेण्यात येणार आहेत. रस्तादुरुस्तीसाठी 23 कोटी 65 लाखांचा प्रस्ताव स्थायी समितीत आणण्यात आला आहे. त्याला समितीच्या पुढील बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे पश्चिम उपनगरातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे
शहर आणि उपनगरातील रस्त्यांचा 2013-14, 2014-15 आणि 2015-16 अशा तीन वर्षांचा विकास आराखडा पालिकेच्या रस्ते अभियंता खात्याने तयार केला आहे. रस्त्याची झीज होणे, भेगा पडणे, जड वाहनांचा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडणारा ताण, विविध कंपन्यांच्या केबल्स टाकण्यासाठी खणण्यात आलेले चर, पाणी साचून रस्ते खराब होणे, जलवाहिन्यांतून होणारी गळती आदींमुळे रस्त्याची दुर्दशा होते. हमी कालावधीच्या आतच रस्ते खराब होतात. डांबरी रस्ते तर तुलनेने लवकर कात टाकतात. अशा रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची गरज असल्याने पालिकेने तसा निर्णय घेतला आहे. पालिका आता रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणावर भर देणार आहे. पावसाळ्यानंतर कॉंक्रीटीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. मे. ए. बी. इन्फ्राबिल्ड प्रा. लिमिटेडसोबत 23 कोटी 44 लाख इतक्या किमतीचा करार समितीच्या मंजुरीसाठी करण्यात आला आहे. एस. व्ही. रोडपासून लिंक रोडपर्यंतचा सरस्वती रस्ता, के. सी. मार्गापासून अंतिम टोकापर्यंत रंगशारदा प्रोमेनेड, लिंकिंग रोडपासून 19 व्या रस्त्यापर्यंतचा 13 वा रस्ता आदी पश्चिम उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या कामांना पावसाळ्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात होणार आहे. दरवर्षी शंभर किलोमीटर रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याचे लक्ष्य आहे