कुलाबा ते भायखळ्यापर्यंतची गणेशोत्सव मंडळे अनुमती न घेता मंडप उभारण्यात आघाडीवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2015

कुलाबा ते भायखळ्यापर्यंतची गणेशोत्सव मंडळे अनुमती न घेता मंडप उभारण्यात आघाडीवर

मुंबई : 1 Oct 2015
पोलीस, वाहतूक पोलीस आणि सर्वात शेवटी महापालिकेची अनुमती न घेता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारण्यात कुलाबा ते भायखळ्यापर्यंतची मंडळे आघाडीवर आहेत. या भागातील ९३ गणेशोत्सव मंडळांना नोटीस बजावली आहे. अनुमती न घेता मंडप बांधणार्‍या मुंबईतील ३0२ मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या हाती पालिकेची नोटीस पडताच त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. 

अनुमती न घेता मंडप उभारणार्‍या मंडळांना नोटीस पाठवण्यात येतील, असा इशारा पालिकेने गेल्या आठवड्यात दिला होता. त्याची अंमलबजावणी बुधवारी झाली. शहर, पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांमधील किती मंडळांना नोटीस पाठवली आहे, याची सूची पालिकेने गुरुवारी जाहीर केली. अनुमती न घेता मंडप उभारलेच कसे याचा खुलासा पालिकेने या मंडळांच्या पदाधिकार्‍यांकडून तातडीने मागवला आहे आणि किती मंडळांना नोटिसा पाठवल्या आहेत, याची सविस्तर माहिती ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात देण्यात येणार आहे, असे पालिकेने सांगितले.

कुलाबा ते भायखळ्यापर्यंतच्या ९३ मंडळांना आणि परळ, वडाळा, दादर, करी रोड, प्रभादेवी परिसरातील ६७, खारदांडा ते अंधेरीपर्यंतच्या ४९ मंडळांना, जोगेश्‍वरी ते मार्वेपर्यंतच्या ४२ मंडळांना, घाटकोपर ते मुलुंडपर्यंतच्या २७, कांदिवली ते दहिसरपर्यंतच्या १८ आणि कुर्ल्यातील ६ मंडळांना व घाटकोपरमधील २ मंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. चेंबूर ते मानखुर्दपर्यंतच्या एकाही मंडळाला नोटीस बजावलेली नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS