पुनर्विकास प्रक्रियेच्या सुलभीकरणाबाबत प्राप्त सूचनांनुसार अंतिम अर्ज मसुदा तयार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2015

पुनर्विकास प्रक्रियेच्या सुलभीकरणाबाबत प्राप्त सूचनांनुसार अंतिम अर्ज मसुदा तयार


मुंबई / प्रतिनिधी / 30 Sep 2015
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारितील भाडेकरारांतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांवरील इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेच्या कामाच्या अनुषंगाने संबंधित अर्ज नमुन्याचे असणारे किचकट स्वरूप व अर्ज केल्यानंतर संबंधित प्रक्रिया किती दिवसात व्हावी, याबाबत निश्चित काल मर्यादा नसल्याने संबंधित कार्यवाहीस विलंब होत होता. हि बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मालमत्ता विभागाशी संबंधित अर्ज नमुन्यांच्या सुलाभिकरणाचे व कालमर्यादा निश्चित करण्याचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता (इस्टेट) खात्यास दिले होते.


त्यानुसार तयार करण्यात आलेले प्रस्तावित अर्ज नमुने नागरिकांच्या / संबंधितांच्या सूचनांसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावर प्राप्त झालेल्या सूचनांबाबत सविस्तर व सांगोपांग विचार करण्यात येउन आता अर्ज नमुन्यांचे अंतिम स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.  तसेच संबंधित प्रक्रियेसाठी कालमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे.  ज्यामुळे नागरिकांना अर्ज करणे सहज, सोपे व सुलभ होणार आहे. त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर किती दिवसात त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल, याचीही निश्चिती व निश्चिंती सुद्धा अर्जदारास असणार आहे.

बृहन्मुंबई महापलिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारितील भाडेकराराअंतर्गत असणा-या भूखंडांबाबत पुनर्विकास करण्यासाठी यापूर्वी आवश्यक असणारा दोन पानी ‘एबीसी’ अर्ज नमुना रद्द करण्यात आला आहे.  आता त्याऐवजी कामाच्या स्वरुपानुसार प्रत्येकी केवळ एका पानाचे अत्यंत सुस्पष्ट व सोप्या भाषेतील पाच अर्ज नमुने असणार आहेत. विशेष म्हणजे या अर्ज नमुन्यांमध्ये अर्जासोबत जोडावयाच्या किमान कागदपत्रांचा संक्षिप्त तपशिल व संबधित विहित शुल्कांची माहिती देखील असणार आहे.

मालमत्ता खात्याशी संबंधित ५ अर्ज नमुने महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळाद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  नवीन अर्ज नमुन्यांनुसार अर्ज केल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेची काल-मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.  ज्यामुळे आपल्या अर्जाबाबत संबंधित प्रक्रिया किती दिवसात होणे अपेक्षित आहे, याची माहिती देखील अर्जदारास अर्ज करतानाच मिळणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS