मुंबईत बी व सी वॉर्डात शौचालयगृहाची कमतरता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2015

मुंबईत बी व सी वॉर्डात शौचालयगृहाची कमतरता

उघडयावर शौचास कोणी जात नाही हा पालिकेचा दुटप्पीपणा समोर
मुंबई 5 Oct 2015 ( प्रतिनिधी ) -  :   मुंबईत बी व सी वॉर्डात शौचालयगृहाची कमतरता आहे असा अहवाल पालिकेने तयार केला असताना दुसरीकडे हे दोन्ही वॉर्ड शौचालयमुक्त असल्याचे जाहिर करून रहिवाशांच्या मागणीकडे  दुर्लक्ष केले आहे. पालिकेच्याच अहवालावरून बी व सी वॉर्डात ८०७ शौचालयाची कमतरता असल्याचे म्हटले आहे. असे असतानाही या वॉर्डात उघड्यावर शौचास कोणी जात नाही हा पालिकेचा दुटप्पीपणा समोर आला आहे.


मुंबईत १२  लाख कुटुंबांकडे स्वत:चे शौचालये नसून ते बाहेरच्या शौचालयावर अवलंबून आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने स्वच्छ मुंबई करण्याचे काम हाती घेतले आहे. यादृष्टीने पालिकेने वॉर्डनिहाय स्वच्छता मोहिम राबवण्याचे काम सुरू केले आहे. मुंबईत शौचालये कमी असल्याने अनेक जण उघड्यावर जातात. अशा ठिकाणचा पालिकेने सर्व्हे करून किती शौचालये कमी आहेत तेथे नवीन बांधण्याची यादी तयार केली आहे. यात बी व सी वॉर्डातही ८०७ पे अॅण्ड युज व सार्वजनिक मोफत शौचालयाची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र दुसरीकडे बी व सी वॉर्डात शौचालयाची गरज नाही. शौचालयाची मुबलक सुविधा असल्याने उघड्यावर कोण जात नाहीत असा दावा पालिकेने केला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ मुंबई करण्याचे आदेश असल्याने स्वच्छ वॉर्ड जाहिर करण्याची पालिकेने ही घाई केली असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

वॉर्ड   :   पे अॅण्ड युज शौचालये (सीटस)  :   कमी   :  सार्वजनिक  :   कमी    : 
बी   :    ३०९                                  :   १८३    :    २९१        :    ३३४   :
सी   :    ४८०                                  :  २९०    :      ०          :     ०      :

Post Bottom Ad

JPN NEWS