इंदू मिलच्या जागेवरील डॉ.आंबेडकर स्मारकासाठी शशी प्रभू अँड असोसिएट्च्या आराखड्याची निवड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2015

इंदू मिलच्या जागेवरील डॉ.आंबेडकर स्मारकासाठी शशी प्रभू अँड असोसिएट्च्या आराखड्याची निवड

मुंबई / प्रतिनिधी / 30 Sep 2015
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी वास्तुविशारद शशी प्रभू अँड असोसिएट्स यांनी सादर केलेला आराखडा स्वीकारण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली. 

मंत्रीमंडळाच्या यापूर्वीच्या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकासाठी अंतिम चाचणीसाठी पात्र ठरलेल्या शशी प्रभू अँड असोसिएट्स आणि फ्रान्समधील जेकब मॅक फर्लेन या दोन संस्थांच्या आराखड्यांचे सादरीकरण झाले होते. त्यावेळी मंत्रीमंडळाने याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे सोपविले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी शशी प्रभू अँड असोसिएट्स या संस्थेचा आराखडा स्वीकारल्याचे जाहीर केले.

Post Bottom Ad

JPN NEWS