मजूर सहकारी संस्थांच्यामाध्यमातून स्कील वर्कर्सना पालिकेच्या कामांची कंत्राटे मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2015

मजूर सहकारी संस्थांच्यामाध्यमातून स्कील वर्कर्सना पालिकेच्या कामांची कंत्राटे मिळणार


मुंबई ( प्रतिनिधी ) - आर्थिक दुर्बलांना रोजगार मिळून देण्याचे स्वप्न साकार होणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या स्कील वर्कर्सना विभागातील तातडीचे विकास कामे निविदेशिवाय देण्याच्या सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधेरे यांच्या  प्रस्तावाला गटनेत्यांनी पाठिबा दिला असून लवकरच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याबरोबर होणार्या बैठकीत या निर्णयावर शिक्का मोर्तब होणार आहे. त्यामुळे छोट्या कौशल्य निपुण कामगारांना रोजगार मिळणार आहे. 


नुकतीच गटनेत्यांची बैठक झाली त्यात सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधेरे यांनी हा प्रस्ताव मांडला. मुंबईत एक हजार मजूर सहकारी संस्था आहेत. त्यात कडिया, वडारी, पेंटर,सुतार, प्लंबर असे हजारो स्कील वर्कर्स येतात. या स्कील वर्कर्सना  रोजगार देण्याचे राज्य शासनाचा अध्यादेश आहे. त्यानुसार पोर्ट ट्रस्ट, म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागात निविदेशिवाय या मजूर सहकारी संस्थेतील स्कील वर्कर्सना कामे दिले जातात.  महापालिकेनेही शासनाच्या अध्यादेशांचे पालन कण्यात यावे अशी मागणी गंगाधेरे यांनी केली. त्याला सर्वच गटनेत्यांनी पाठींबा दिला, तर पालिका आयुक्त या विषयावर गंगाधरे  यांच्यासह चर्चा  करणार आहेत. 

मजूर सहकारी संस्थेत अनेक कुशल कामगार आहेत. त्यांना रोजगार दिल्यास कंत्राटदरांची  मक्तेदारी मोडता येईल. तसेच भ्रष्टाचारालाही आळा बसेल, त्यामुळे तातडीने मजूर सहकारी संस्थाना विकास कामही  कंत्राट निविदेशिवाय दिले पाहिजे असे गंगाधरे यांनी सांगितले.  नगरसेवकांना त्यांच्या विभागात तातडीची कामे होण्यासाठी  या मजूर सहकारी संस्थांचा मोठा उपयोग होईल असे गंगाधरे म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS