उद्धव ठाकरे यांना हव्यात मुंबईतील मोक्याच्या जागा - नारायण राणे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2015

उद्धव ठाकरे यांना हव्यात मुंबईतील मोक्याच्या जागा - नारायण राणे

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईतील मोक्याच्या जागा हव्या आहेत. 
उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 
यांच्या बाबत काहीही प्रेम नाही, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे 
ज्येष्ठ नेते नारायण राणे केला आहे.  

मुख्यमंत्री पद टिकावे यासाठी फडणवीस यांनी बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यात
करण्यास संमती दिली तर उद्धव ठाकरे यांना मोक्याच्या जागा हव्या आहेत, असे राणे म्हणाले.
कोणत्याही कायदेशीर बाबी न तपासता मुख्यमंत्र्यांनी महापौर बंगला स्मारकासाठी दिला.
त्यामुळे या ठिकाणी स्मारक होऊ शकत नाही ही जागा हेरिटेज आहे. CRZ चे नियम या जागेला
लागु आहेत. कल्याण डोंबिवलीत मनसे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार होती पण केवळ
महापौर बंगल्याची जागा उद्धव यांना स्वार्थसाठी पाहिजे होती, म्हणून भाजपबरोबर त्यांनी
ताळमेळ ठेवला, असे राणे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS