परवानगीशिवाय मंडप उभारणार्‍या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2016

परवानगीशिवाय मंडप उभारणार्‍या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई

मुंबई - महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारणार्‍या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परवानगीशिवाय मंडप उभारणार्‍या गणेशोत्सव मंडळांची नोंदणी रद्द करण्यासाठी महापालिका न्यायालयात जाणार आहे.
मुंबईमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारण्यास परवानगी मिळावी म्हणून महापालिका आणि पोलिसांकडे २ हजार ५३० अर्ज आले होते. त्यापैकी १ हजार २८८ गणेश मंडळांंना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली तर ५०५ मंडळांच्या परवानग्या नाकारण्यात आल्या. पोलिसांनी ५९८ आणि महापालिकेच्या विविध वॉर्डांनी १३९ मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली नव्हती. यावर्षी गणेशोत्सवात ७३७ मंडळांना मंडप उभारण्याच्या परवानग्या नाकारण्यात आल्या आहेत. 

तरीही अनेक मंडळांनी महापालिका आणि पोलिसांच्या परवानग्या नसतानाही मंडप उभारले असल्याने महापालिका अधिनियम १८८८च्या ३१४ अन्वये या मंडळांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या मंडळांवर तात्पुरते अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात येणार आहे. धर्मादाय आयुक्तांकडे मंडळांनी नोंदणी केलेली असल्याने त्यांच्याकडून महापालिका या मंडळांची यादी घेणार आहे. तसेच बुधवारी वॉर्डनिहाय परवानगीशिवाय मंडप उभारणार्‍या मंडळांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका ही यादी न्यायालयात सादर करून या मंडळांची नोंदणी रद्द करण्यात यावी किंवा त्यांना दंड ठोठावण्यात यावा अशी विनंतीही न्यायालयाला करण्यात येणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS