राणीबागेतील हम्बोल्ट पेंग्विन मुंबईच्या वातावरणात रूळले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2016

राणीबागेतील हम्बोल्ट पेंग्विन मुंबईच्या वातावरणात रूळले


Inline image 1

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) व प्राणिसंग्रहालयात जुलै महिन्यात आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले असून यामध्ये एकूण ३ नर व ५ मादी यांचा समावेश आहे. बर्फाळ प्रदेशातील पाहुणे मुंबईमधील वातावरणात रूळतील का? असा प्रश्न उपस्थित होत असताना. पेंग्विन पक्षींना येऊन दीड महिना झाला आहे, परंतु कसलाही त्रास न होता मुंबईच्या वातावरणात पेंग्विन चांगले रूळले आहेत.


दक्षिण कोरियातील सेऊलमधून हॅमबोल्ट प्रजातीचे आठ पेंग्विन आणण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत खास प्रशिक्षक आला असून महापालिकेतील कर्मचारी यांच्याकडून पेंग्विनची देखभाल कशी करावी याचे धडे गिरवत आहेत. महापालिकेने पेंग्विनसाठी खास दक्षता घेतली आहे. तसेच यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत. या पाहुण्याच्या वास्तव्याला येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

राणीच्या बागेतील पेंग्विनला मुंबईतील वातावरण आता पोषक झाले आहे. दीड महिन्यानंतर पेंग्विनचे वजन ही वाढले आहे. पेंग्विनंना रोज वेगवेगळे प्रकारचे मासे खायला दिले जातात. तसेच आठवड्यातून एकदा त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. मुंबईतील या प्रकल्पाला लागणाऱ्या सर्व परवानग्या केंद्र सरकारकडून भेटल्या आहेत. ऑक्टोबर शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात पेंग्विन मुंबईकरांना बघायला मिळणार आहेत असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS