मुंबई मधील ८० टक्के नगरसेवकांना नव्या प्रभाग रचनेचा फटका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मधील ८० टक्के नगरसेवकांना नव्या प्रभाग रचनेचा फटका

Share This
खुल्या प्रवर्गातील ४ मतदार संघ कमी झाले
आजच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत आहे. मुंबईमधील शहर व उपनगरातील लोकसंख्या बदलामुळे प्रभागांची फेररचना करण्यात आली आहे. महापालिकेने केलेल्या नव्या फेररचनेचा फटका सध्याच्या ८० टक्के नगरसेवकांना बसला आहे. यामुळे या नगररसेवकांना ३ ऑक्टोबरला होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीनंतर आपले नवे प्रभाग शोधण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.

मुंबईमध्ये शहर व उपनगर असे दोन जिल्हे येतात. शहराची लोकसंख्या कमी झाल्याने व उपनगरातील लोकसंख्या वाढवल्याने सर्वच २२७ प्रभागांची फेररचना करण्यात आली आहे. फेररचना करताना एका प्रभागात ५४ हजार किंवा त्यामध्ये कमीअधिक १० टक्के लोकसंख्या असेल अशी प्रभाग रचना करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत केलेल्या बदलामुळे मुंबईमधील २२७ पैकी ८० टक्के प्रभागांच्या सिमारेषेत बदल झाले आहेत. उपनगरात जवळपास १५ प्रभागांच्या सिमांरेषेत कोणतेही बदल झालेले नाहीत. २० ते २५ प्रभागांच्या ८० टक्के सिमारेषेत बदल झालेले आहेत. तर उर्वरित प्रभागांच्या सिमारेषेत ४० टक्के बदल झालेले आहेत. ३ ऑक्टोबरला १५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती, ६१ इतर मागासवर्ग, ५० टक्के महिला आरक्षणाच्या प्रभागांची सोडत होईल या नंतर उरलेल्या प्रभागामधून इतर नगरसेवकांना निवडणुकीसाठी आपले प्रभाग निवडावे लागणार आहेत.

महापालिकेच्या सन २०१२ च्या निवडणुकीमध्ये २२७ प्रभागांपैकी पैकी अनुसूचित जातीचे ११, अनुसूचित जमातीचे १२, इतर मागासवर्गचे ६१, महिलांसाठी ७६ तर खुल्या प्रवर्गासाठी ७७ प्रभाग होते. २०१७ च्या निवडणुकीदरम्यान अनुसूचित जातीची लोकसंख्या २ लाखाने वाढून ८ लाख १२ हजार झाली आहे. यामुळे अनुसूचित जातीच्या प्रभागांमध्ये ४ ने वाढ झाली आहे. अनुसूचित जातीसाठी सन २०१२ मध्ये ११ प्रभाग होते. त्यात वाढ होऊन सन २०१७ च्या निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जातीचे ४ प्रभाग वाढल्याने खुल्या वर्गातील ४ प्रभाग कमी झाले आहेत. खुल्या प्रवर्गातील २ महिला तर २ पुरुष मतदार संघ कमी झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी प्रभागांचे आरक्षण करताना निवडणुकीपूर्वीच केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने मित्रपक्ष शिवसेने बरोबर विरोधी पक्षातील काँग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष यांना झटका दिला असताना ३ ऑक्टोबरला होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीसाठी आरक्षित प्रभागांची संख्या                                
                               २०१२       २०१७
अनुसूचित जाती         ११           १५
अनुसूचित जमाती        २             २
इतर मागासवर्ग          ६१            ६१
महिला                       ७६            ७४
खुला प्रवर्ग                 ७७            ७५
एकूण                      २२७           २२७

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages