आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 April 2017

आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग


मुंबई, दि. 14 - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केले जाते. आंबेडकरी अनुयायांसाठी ट्विटरने खास हॅशटॅग उपलब्ध करुन दिले आहेत. ट्विटवर #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेलं इमोजी येईल. ट्विटरने याव्यतिरिक्त #अंबेडकरजयंती #DalitLivesMatter #JaiBhim #जयभीम असे अजून चार हॅशटॅग दिले आहेत. ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरने एकूण पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे. हॅशटॅगमुळे सर्च करताना त्यासंबंधी सर्व गोष्टी सर्च करणंही सोपं जातं. या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. गेल्या वर्षी गुगलनं खास डूडल तयार करुन बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं. ट्विटरने या हॅशटॅग इमोजीच्या माध्यमातून एकाप्रकारे बाबासाहेबांना अभिवादनच केलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS