दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2017

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण


मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद,सांगली अंतर्गत मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह या संस्थेच्यामार्फत सन 2017-18 च्या चालू शैक्षणिक वर्षासाठी दिव्यांगांना मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफीस (संगणक कोर्स)-किमान 8वी पास, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स)-किमान 9वी पास, एम.एस.सी.आय.टी. (संगणक कोर्स) यांचा प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा असून वयोमर्यादा ही 16 ते 40 वर्ष अशी आहे. तसेच या संस्थेमध्ये फक्त दिव्यांग मुलानांच प्रवेश दिला जाणार आहे.

संस्थेमध्ये मुलांना प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे. अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक संस्थेला लाभले आहे.

यासाठी प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ अंपग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली, पिनकोड क्र. 416410, दूरध्वनी क्र. 0233-2222908,मोबाईल क्र. 9922577561/9975375557 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील.

प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अंपगत्व असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व उत्पनाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती सोबत जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे दि. 31 जुलै 2017 पूर्वी पोहचतील याची दक्षता घ्यावी. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल, असे शासकीय प्रौढ अंपग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाचे अधीक्षक यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS