बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून ७२ तासांत ३५ रुग्णांवर तातडीने उपचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2017

बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून ७२ तासांत ३५ रुग्णांवर तातडीने उपचार


मुंबईतील दाटीवाटीचा परिसर, रेल्वे स्थानक येथून सर्वाधिक कॉल
मुंबई, दि ४ : मुंबई मध्ये बाईक अँब्युलन्सची उपयुक्तता सिद्ध होत असून ह्या सेवेचा शुभारंभ झाल्याच्या अवघ्या ७२ तासांत ३५ रूग्णांनातातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. विशेषतः शहरातील दाटीवाटीचा परिसर, रेल्वे स्थानकांवरील अनेक आपत्कालीन प्रसंगांमध्ये ही सेवा अतिशय उपयुक्त ठरत आहे. आतापर्यंत या सेवेच्या माध्यमातून तातडीचे प्रथमोपचार करण्यात आलेली बरीच प्रकरणे ही रेल्वे स्थानक व परिसरातील आहेत.

बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी शुभारंभ झाल्यानंतर त्या रात्री लगेच २ रुग्णांना बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून आपत्कालीन सेवा पुरविण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ आणि आज २१ अशा एकूण ३५रुग्णांवर प्रथमोपचार करण्यात आले. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांना योग्य वेळी पुढील उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याने अनेकांचे प्राण वाचविण्यात आले. काल गुरूवारी शहरातील वेगवेगळ्या भागातील घटनांमध्ये १२ रुग्णांना या सेवेचा लाभ झाला. ठाकूर व्हिलेज परिसरातील अपघाताच्या प्रकरणातील २५ वर्षीय तरुणावर तसेच धारावी पोलीस स्थानक परिसरातील जळीत रुग्णावर तत्काळ प्रथमोपचार करण्यात आले. भांडूप परिसरातील तरुणाला रस्त्यावरच चक्कर आल्याने त्यावर उपचारासाठी १०८ क्रमांकावर फोन करण्यात आला. भांडूप परिसरातील दुचाकीस्वार डॉक्टरांनी गर्दीची आडकाठी येऊ न देतात्याच्यावर उपचार केले. मुंबईच्या प्रचंड रहदारी असणाऱ्या शहरात ज्या भागात जिथे अरुंद रस्त्यांमुळे मोठी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा परिसरात ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सुरुवातीच्या ७२ तासातील विविध प्रकरणांवरून दिसून येत आहे.

१०८ वर प्राप्त झालेल्या अनेक कॉल्समध्ये पादचारींकडून रुग्णांची माहिती कळविण्यात आली आहे. बोरीवली,वांद्रे रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर, मुंबई विमानतळ येथून देखील यासेवेसाठी कॉल करण्यात आले आहे. सायन कुर्ला पुल, चिता कॅम्प, मालाड, सांताक्रुज, गोरेगाव चित्रनगरी, कलिना कॅम्पस, भांडुप, नागपाडा, कुरार, चारकोप, जोगेशेवरी आदी भागातील रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. विविध आपत्कालीन परिस्थितीतील तसेच अचानक उदभवलेल्या प्रकृती अवस्थतेच्या प्रकरणांतील रुग्णांवर तातडीने केलेल्या उपचारांमुळे अनेकांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीसांगितले.

मुंबईतल्या वेगवेगळ्या अशा १० ठिकाणी या बाईक अँब्युलन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. १०८ या निशुल्क हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. शहरातील ज्या भागातील रुग्णावर आपत्कालीन परिस्थिती ओढवली असेल त्या भागापासून नजीकच्या बाईक अँब्युलन्सद्वारे तात्काळ आरोग्यसेवा या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरविण्यात येत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS