शिवसेनेनंतर हँकॉक पुलाचे काँग्रेसनेही केले भूमीपूजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 February 2018

शिवसेनेनंतर हँकॉक पुलाचे काँग्रेसनेही केले भूमीपूजन


मुंबई । प्रतिनिधी - मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील पाडण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन हँकॉक पुलाचे भूमीपूजन सोमवारी सत्ताधारी शिवसेना व पालिकेने केले. हे भूमिपूजन म्हणजे श्रेय घेण्याचा प्रकार असल्याचा आरोप करून काँग्रेससह विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. या परिस्थितीत दुस-याच दिवशी आज मंगळवारी पुलाचे भूमीपूजन काँग्रेसने केले. त्यामुळे शिवसेना, काँग्रेसमध्ये पुलाच्या श्रेयासाठी असलेली धडपड समोर आली आहे.

दोन वर्षानंतर या पुलाचे बांधकाम सुरु झाल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुलाचे सोमवारी भूमीपूजन करून पुलाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. मात्र ज्या प्रभागात हा पूल जातो, त्या काँग्रेसच्य़ा स्थानिक नगरसेवकांना या भूमीपूजनाबाबत माहिती न देता सत्ताधा-य़ांनी भूमीपूजन केल्याने काँग्रेसने या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. सोमवारी भूमीपूजन झाले असताना पुन्हा दुस-यादिवशी काँग्रेसने या पुलाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम करून श्रेय घेतले. त्यामुळे पुलावरून सत्ताधारी - विरोधकांमध्ये श्रेयवाद सुरु झाला आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याच्या उद् घाटनावरूनही श्रेयाचा वाद रंगण्याची शक्यता आहे. आगामी 2019 ला होणा-या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठीच हा श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

Post Bottom Ad

JPN NEWS