परेल, एलफिन्स्टन परिसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परेल, एलफिन्स्टन परिसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश

Share This

मुंबई | प्रतिनिधी - गेल्या वर्षी पावसाळ्यादरम्यान मुंबईची तुंबाई झाली होती. मुंबईत १५५ ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. त्यापैकी महत्त्वाच्या ५५ ठिकाणांबाबत आवश्यक त्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी राबवून येत्या पावसाळ्यात या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे व्हावा यादृष्टीने महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केईएम रुग्णालय व एलफिन्स्टन स्टेशनजवळच्या परिसरात सुरु असलेल्या विविध कामांना भेट देऊन कामांची पाहणी केली. अपेक्षित कामे एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देशही आयुक्तांनी पाहणी दौ-यादरम्यान संबंधित अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत.

दौ-यादरम्यान महापालिका आयुक्तांनी एलफिन्स्टन स्टेशनच्या जवळपासचा परिसर, मडूळकर मार्ग, फितवाला लेन, सेनापती बापट मार्ग, एस.एल. मटकर मार्ग, टेमकर मार्ग, मडकेबुवा चौक, हिंदमाता जंक्शन आदी परिसरातील कामांची पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने एलफिन्स्टन स्टेशनजवळील ६०० मिमी व्यासाच्या ३ 'पाईपड्रेन' च्या जागी खुल्या पद्धतीचे कल्व्हर्ट तयार करण्याच्या कामाची पाहणी; आणि ३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या परिसरातून जाणा-या ७५० मिमी व्यासाच्या पर्जन्यजल वाहिनीवर मॅनहोल उपलब्ध करुन देण्याच्या कामाचीही पाहणी केली. तसेच एलफिन्स्टन पश्चिम आणि फितवाला लेन येथे रेल्वेच्या परिसरात व रेल्वे कारशेडच्या खाली असणा-या ६०० मिमी व्यासाच्या 'पाईपड्रेन' चे रुपांतरण 'बॉक्स ड्रेन' मध्ये करण्याच्या कामाबाबत आयुक्तांनी आढावा घेतला. याबाबत आवश्यक त्या परवानग्या मिळविण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही प्रमुख अभियंता पर्जन्यजल वाहिन्या यांनी तातडीने करावी व त्यानुसार अपेक्षित कामे तातडीने करावे, असेही निर्देश दौ-या दरम्यान महापालिका आयुक्तांनी दिले.

एलफिन्स्टन परिसरातील मडूळकर मार्ग, टेमकर मार्ग येथील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्याच्या दृष्टीने फितवाला लेनच्या जंक्शन पासून सेनापती बापट मार्ग ते एस. एल. मटकर मार्गांजवळ 'आरसीसी बॉक्स ड्रेन' चे बांधकाम एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. तसेच मडकेबुवा चौकातील 'आर्क ड्रेन' ही 'बॉक्स ड्रेन' मध्ये रुपांतरीत करण्याच्या दृष्टीने महानगर गॅस लिमिटेड, उद्यान खाते, मुख्य अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या) आदी विविध खात्यांशी, संस्थांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घ्यावेत असे आदेश अतिरिक्त आयुक्त (शहर) यांनाही दिले आहेत. त्यामुळे हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होऊ शकेल, असा दावा पालिकेने केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages