
मुंबई | प्रतिनिधी - धुलिवंदन दिवशी मुंबई शहर व उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असते. सदर बाब लक्षात घेऊन, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शुक्रवारी 2 मार्चरोजी धुलिवंदन दिवशी उपक्रमाच्या प्रवर्तनातील अनुसूचित बसगाड्यामध्ये कपात करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी एकूण 1992 अनुसूचित बसगाड्यापैकी 1028 बसगाड्या व दुपारी 2365 अनुसूचित बसगाड्यापैकी 1313 बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहेत, याची मुंबईतील सर्व बसप्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.
