मनसेच्या दणक्यानंतर अ‍ॅमेझॉन वठणीवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२६ डिसेंबर २०२०

मनसेच्या दणक्यानंतर अ‍ॅमेझॉन वठणीवर



मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळ खट्याक केल्यानंतर ऍमेझॉन वठणीवर आले आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे.

ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं त्यांनी टाकलं आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असं सांगितलं होतं. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अ‍ॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं,” असं अखिल चित्रे यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS