धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

Share This

मुंबई - काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेवरील ग्रॅण्ट रोड स्थानकात धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न झाला आहे.  रेल्वे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मालाड येथे राहणाऱ्या तरुणीने चर्नी रोडहून चर्चगेट दिशेकडील लोकल पकडली. लोकल ग्रॅण्ट रोड स्थानकात पोहोचताच तरुणाने तिच्याशी अश्लील भाषेत बोलणे सुरू करत शिवीगाळ केली. तरुणीने आरडाओरडा केला असता, त्याने धावत्या लोकलमधून पळ काढला. ही घटना २४ जून रोजी घडली. ही तरुणी खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. तिने २८ जून रोजी तक्रार केल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे, असे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सांगितले.

या आधी घडलेल्या घटना - 
काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. नेरुळ येथून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पनवेलला निघालेल्या लोकलमध्ये विनयभंग झाल्याची तक्रार या महिलेने नोंदवली होती. या प्रकरणी निषाद धारीया याला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २० जून रोजी नेरूळ-पनवेल लोकलच्या पनवेल दिशेकडील दिव्यांग डब्यामागील सामान्य डब्यात एक तरूणी आपल्या होणाऱ्या पतीसोबत प्रवास करत होती. यावेळी निषाद धारिया याने तिला धक्का देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तरुणी सावरून उभी राहिली मात्र, बेलापूर ते खारघरपर्यंत वारंवार शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत होता. या तरूणीने पनवेल रेल्वे पोलीस गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली असून धारियाला अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages